बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचा नवरदेव सजून बसलाय पण वऱ्हाडी आहेत कुठं…?- पंकजा मुंडे

बीड | लग्नघटिका जवळ आलीय… बॅन्डबाजा वाजतोय… राष्ट्रवादीचा नवरदेव सजून बसलाय पण वऱ्हाडी आहेत कुठं? असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

सगळे वऱ्हाडी तर आमच्या वरातीत सामील झाले आहेत, अशी बोचरी टीका पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीवर केली आहे. 

वरात निघालीय पण पुढे नाचायलाही कुणी नाहीये आणि मागे नाचायलाही कुणी उरलं नाही, असं म्हणत पंकजा मुंडेनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

दरम्यान, आमच्या वरातीत हिरवा, निळा, पिवळा, भगवा, असे रंग सोबत आहेत. त्यामुळे आमचा विजय पक्का असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट!

-शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह 80 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

-देवेगौडांची पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना नाही तर ‘या’ मुख्यमंत्र्याना पसंती

-शरदराव… तुम्ही तिकडं शोभत नाही; नरेंद्र मोदींचा पवारांना टोला

-सोलापुरचे भाजप उमेदवार म्हणतात, तुमची अडचण परिचारकांच्या कानात सांगा विठ्ठलापर्यंत पोहचेल!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More