पुणे | भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार महेश लांडगे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महेश लांडगेंना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन भोसरीकरांना केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलं आहे.
माझा आणि महेश लांडगेंचा परिचय खूप वर्षांपासूनचा आहे. त्यांनी घेतलेल्या बचतगटाच्या कार्यक्रमाला मी उद्घाटन म्हणून आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. बचत गटाचं मोठं काम लांडगेंच्या माध्यमातून उभं राहिल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
पूर परिस्थितीच्या वेळी त्यांनी मोठी मदत केली होती. आपल्या मतदारसंघासाठी धडपडणारा एक युवा नेता, त्यांना आपण मागेही संधी दिली होती. गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे आणि आघाडीचे विलास लांडे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे लढतीत कोण बाजी मारतं हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास” – https://t.co/ieagA7EHtw @MLAMaheshLandge
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
सोशल मीडियाच्या हवेवर जाऊ नका… तो भ्रम आहे; सुरेश धस यांची रोहित पवारांवर टीका https://t.co/7NuvyE67Ui #suresh_dhas @RohitPawarSpeak
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
“महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होता”- https://t.co/8eiXEW9oIb #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
Comments are closed.