अमित शहा समजदार नेते; त्यांना ‘हमारी मुख्यमंत्री’…या घोषणांचा अर्थ कळतो- पंकजा मुंडे

बीड | दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सावरगाव येथे आले होते. यावेळी सभेतील कार्यकर्त्यांनी हमारी मुख्यमंत्री अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अमित शहा हे खूप समजदार नेते आहेत. त्यांना या घोषणांचा अर्थ कळतो. मी फक्त भाजप युतीचं काम करत राहणार आहे, असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलं आहे. दसरा मेळाव्यात मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं.

गृहमंत्री अमित शहा माझ्या कार्यक्रमासाठी आले हे मी माझं भाग्य समजते. त्यामुळं माझं वजन वाढलं असं काही नाही. कारण भाजपमध्ये नेत्याचं वजन असं काही नसतं. तसेच निवडणुकीबद्दल मला कसलीही भीती नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

दरम्याळ, परळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या दोघांमध्ये रंगतदार लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-