“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Pannalal Shakya Strange Advice to Students

Pannalal Shakya | देशात विविध परिक्षांमध्ये होणारा घोळ, पेपरफूटी यावरून काही दिवसांपुर्वी वातावरण चांगलंच तापलं होतं. विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारवर या प्रकरणी संताप व्यक्त केला होता. संसदेत देखील कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. अशात भाजपच्या एका आमदाराने विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

“कॉलेजच्या पदव्या घेऊन काही होणार नाही, मोटरसायकल पंक्चरचे दुकान सुरू करा, यामुळे तुमचा उदरनिर्वाह तर होईल.”, असा अजब सल्ला भाजप आमदाराने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

मध्य प्रदेशमधील गुना मतदारसंघातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य (Pannalal Shakya) यांनी प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सीलेंसच्या उद्घाटन समारंभात हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिलाय. या कार्यक्रमाचे उद्घाटन मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी केले.

नेमकं काय म्हणाले पन्नालाल शाक्य?

“ही कॉलेज आहेत, शिक्षण संस्था आहेत या काही कंप्रेशर हाउस नाहीत. ज्यामध्ये डिग्रीच्या हिशोबाने हवा भरली जाईल आणि ते सर्टिफिकेट घेऊन जातील. वास्तवात शिक्षण संस्था अशा असतात ज्यांचे ‘ढाई अक्षर पढ़े सो पंडित होय,पोथीपढ़-पढ़ जगमुआ पंडित भया न कोय'”, असं पन्नालाल शाक्य (Pannalal Shakya) म्हणाले.

तसंच पुढे त्यांनी सांगितलं की, “नालंदा विद्यापीठमध्ये 12 हजार विद्यार्थी होते आणि 1200 शिक्षक. मात्र, 12 लोकांनी ते जाळले आणि बाकीचे बघत राहिले. हे बाकीचे केवळ विचार करत राहिले की, मी एकटा काय करणार. त्यामुळे हिंदुस्तानचे ज्ञान संपले.”

“कॉलेजच्या डिग्रीने काहीच होणार नाही..”

यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला. “आज आपण प्रधानमंत्री श्रेष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन करत आहोत. मी तुम्हाला एकच सांगेल की, केवळ एक बोध वाक्य लक्षात घ्या, या कॉलेजच्या डिग्रीने काहीच होणार नाही. मोटरसायकल पंक्चरचे दुकान उघडा.यामुळे कमीत कमी आपला उदरनिर्वाह तर चालेल.”, असं पन्नालाल शाक्य (Pannalal Shakya) म्हणाले आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय.

News Title- Pannalal Shakya Strange Advice to Students

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्यापेक्षा..”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

तब्बल 46 वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचं कुलूप उघडलं; धन बघून थक्क व्हाल

छगन भुजबळ मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत?, शरद पवारांनंतर राहुल गांधींनाही भेटणार?

पुणेकरांची चिंता वाढली! झिका व्हायरसनंतर आता ‘या’ रोगाचा शिरकाव

अजित दादांना कसलीही कल्पना न देता भुजबळ थेट शरद पवारांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .