पनवेल | क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. कोरोना व्हायरसची भीती असताना पनवेलमधील या घटनेनं परिसरातील सर्वांच्याच मनात धडकी भरली आहे.
संबंधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना संशयित महिलेला नुकतंच पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र या महिलेवर मध्यरात्री एका विकृत तरूणानं बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीनं देण्यात आली आहे.
महिलांच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरूष आलाच कसा? असा सवालही आता या निमित्तानं लोकांकडून विचारण्यात येत आहे. यासोबत हा प्रकार घडण्याच्या दरम्यान पोलिस, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन नक्की झोपली होती का?, अशा शब्दात आता स्थानिक नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पनवेलमधील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाली असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“हे सरकार पडणार नाही, फडणवीसांनी आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावे”
पुण्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल
‘दिशा कायदा ही केवळ घोषणाच होती का?’; चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांना सवाल
पुण्यात कोव्हिड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
“फडणवीसांना कोरोना वगैरे होऊ नये, त्यांचे बाल-बच्चे आणि राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत”
Comments are closed.