Pankaja Dhananjay - परळी बाजार समितीवर धनंजय मुंडेंची बाजी, पंकजा मुंडेंचा पराभव
- महाराष्ट्र

परळी बाजार समितीवर धनंजय मुंडेंची बाजी, पंकजा मुंडेंचा पराभव

बीड | मुंडे भावा-बहिणीने प्रतिष्ठेची बनवलेल्या परळी बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारलीय. राष्ट्रवादी काँग्रेसने १८ पैकी १४ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवलीय. 

जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र सुरेश धस यांनी बंडखोरी केल्याने सत्तेच्या चावा भाजपच्या हाता गेल्या होत्या. त्यामुळे परळी बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा