Parali Vidhansabha l आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. अशातच या विधानसभेला परळी मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कारण या मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मात्र आता बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान सुरू असताना राज्यातील काही ठिकाणी वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण :
अशातच, बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. मात्र या दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार तरुणांनी जोरदार मारहाण केली आहे.
यासंदर्भातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी मतदान केंद्राबाहेर उभे असताना ऍड. माधव जाधव यांच्यावर तरुणांनी हा हल्ला करण्यात आला आहे. मात्र माधव जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
Parali Vidhansabha l मतदान केंद्राची तोडफोड :
याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले आहेत. मात्र आता मतदान केंद्रामध्ये मतदान चालू असतानाच तीन ते चार कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र कोंडण्याची घटना घडली आहे.
News Title – Parali Vidhan Sabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप
शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला
ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला किती मिळणार पोटगी?
अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर धक्कादायक आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण आलं समोर