बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांची ‘ती’ मागणी वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंची डोकेदुखी?

मुंबई | एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुमत असल्याचं वारंवार दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा तपास एसआयटीच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या  प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास आयोगाकडे देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. अनिल देशमुखांनी दिलेल्या या संकेतामुळे मुख्यमंत्री ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एल्गार प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटीच्या माध्यामातून करावा, अशी आग्रही भूमिका शरद पवारांनी या आधीच केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी या हा तपास राष्ट्रीय तपास आयोगाजद्वारे करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिला. त्यांच्या या निर्णयावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा समांतर तपास केला जाईल का? याबाबत कायद्येशीर सल्ला घेत असल्याचं अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. गृहमंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाऊ शकते, असे संकेतही देशमुखांनी दिले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मला राजकारणात यायचं नव्हतं पण…- पूनम महाजन

शेतकऱ्यांनी वीज बीलं भरु नये- रघुनाथ पाटील

महत्वाच्या बातम्या-

पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

केजरीवालांची फुकट योजना महाराष्ट्रात नको- अजित पवार

अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More