मुंबई | मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता होती.
परमबीर सिंह हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहतात. त्यांची आयुक्तपदी निवड झाल्याने आता त्यांच्या जागी बिपीन. के सिंह यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक ठाकरे सरकारने जाहीर केले आहे.
परमबीर सिंह हे यापूर्वीही मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती.
दरम्यान, संजय बर्वे हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून शनिवारी निवृत्त झाले. त्यांना एका वर्षाचा कालावधी मिळाला होता. मात्र, त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना सहा महिने अधिक मिळाले होते.
ट्रेंडिंग बातम्या-
शेतकरी आत्महत्येवर मुलाकडून कविता सादर; दोन तासांनी वडिलांची आत्महत्या
“ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेचा ठराव केंद्राने फेटाळला”
महत्वाच्या बातम्या-
सुप्रिया सुळेंनी केलं रक्षा खडसेंचं कौतुक; नाथाभाऊ म्हणतात…
एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच केलं फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले…
जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Comments are closed.