परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत
मुंबई | परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकडे तक्रार केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये निलंबन न करण्यासाठी 50 लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप अनुप डांगे यांनी केला आहे. यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी परमीबर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
परमबीर यांनी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला उशिरा रात्री सुरु असलेल्या भरत शाह यांच्या पबवर कारवाई करण्यास न देता त्यांनाच निलंबित केले. परमबीर भ्रष्टाचारी असल्याची जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
निकटवर्तियांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाब गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला असल्याबाबत पत्र डांगे यांनी लिहिले असून भरत शाह आणि जितू नवलानी यांच्याशी परमबीर यांचे संबंध असून त्यांचे अंडरवर्ल्डशी देखील संबंध आहे. परमबीर हा केंद्र सरकारचा बोलका पोपट असून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी ते हे कृत्य करत आहेत, असं राऊत म्हणालेत.
अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. अनुप डांगे यांनी परमीबर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या खळबळ उडाली आहे. यामुळे आता परमबीर सिंग अडचणी येण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!
मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल- शरद पवार
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18 वर्षीय मुलीनं बाप झोपेत असतानाच त्याचा गळा आवळला; ‘हे’ ठरलं कारण!
पुण्याची मान शरमेनं खाली!; महिलांवरील ‘या’ अत्याचारात पुणे सर्वात पुढे!
Comments are closed.