बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) फरार घोषित केल्यानंतर अखेर दोन महिन्यांनी समोर आले. मुंबईत परत येताच परमबीर सिंह यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे. असं असताना परमबीर सिंहांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. अनेक प्रकरणात या दोघांची चौकशी सुरू आहे. अशातच चांदीवाल समितीसमोर (Chandiwal Commite) चौकशीला जाण्यापूर्वी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

वाझे आणि सिंह यांची ही भेट कायद्याला धरून नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला. तर या भेटीवरून सिंह आणि वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या भेटीविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. या भेटीची आता चौकशी होणार असल्याची माहिती वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली आहे.

चौकशीला जाणारे दोन व्यक्ती किंवा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत. ते का भेटले? कशासाठी भेटले? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली. तर एखाद्या केसमधील आरोपीला भेटता येत नाही, असं म्हणत वाझे आणि सिंह यांच्या भेटीची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘दी़ड फूटी उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झाला आहे’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची भेट टळली; ‘हे’ कारण आलं समोर

’25 वर्षाचा संसार मोडला’, असं म्हणणाऱ्या महाजनांना जयंत पाटलांनी दिलं हे सणसणीत उत्तर

पराग अग्रवालच्या नियुक्तीनंतर एलॉन मस्कने केलं भारतीय प्रतिभेचं कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More