मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर झालेल्या अनेक आरोपांमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली.परमबीर सिंह प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. सिंह यांच्यावरील आरोपांमुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालं असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.
परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या सर्व प्रकरणांचा तपास राज्य सरकारकडून सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणांतील सर्व माहिती एका आठवड्याच्या आत सीबीआयकडे सुपुर्त करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिला आहे.
हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून परमबीर सिंह यांचे निलंबन कायम राहणार आहे. सिंह यांच्या प्रकरणात एखादी एफआयआर जरी दाखल झाली तरी त्याचा तपास सीबीआय करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, गृहमंत्री आणि आयुक्त जेव्हा अशा प्रकारचे आरोप करतात तेव्हा लोकांचा न्यायवयवस्थेवरील विश्वास उडतो. त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी व या प्रकरणाच्या नि:पक्ष चौकशीसाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याची योजना होती”
नितीन गडकरींच्या घोषणेनंतर पुण्यातील ‘हे’ दोन टोलनाके बंद होणार
“रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची भेट घेणार”
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब, म्हणाले…
“तेच मूर्ख, तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते”
Comments are closed.