बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे. पण अनिल देशमुखांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावरच खंडणी आणि अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल झाले.

परमबीर सिंह यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स (Summons) बजावूनही ते हजर झाले नाहीत. त्यानंतर दोन महिन्यांपासून अज्ञातवासात असलेल्या परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं. परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले पण तेव्हापासून त्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमीरा सुरूच आहे. चार वेळा समन्स बजावल्यानंतर अखेर परमबीर सिंह आज चांदीवाल समिती समोर हजर होणार आहेच.

चांदिवाल आयोगात 100 कोटी वसूलीच्या आरोपांची चौकशी होत आहे. या प्रकरणी चांदिवाल समितीने परमबीर सिंह (Parambir Singh) यांना चार वेळा समन्स बजावले. तसेच दंडात्मक शिक्षाही सुनावली पण परमबीर सिंह चौकशीसाठी समोर आले नव्हते. अनेकदा समन्स बजावल्यावर परमबीर सिंह आज 11 वाजताच्या सुमारास चौकशीसाठी हजर होणार आहेत.

परमबीर सिंह यांचं अटक पात्र वॉरंट अजूनही रद्द केलेलं नाही. तर हेच वॉरंट रद्द करावं या मागणीसाठी आणि चौकशीसाठी परमबीर सिंह आज चांदिवाल समितीच्या चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. (Parambir Singh To Appear Before Chandiwal Commitee)

थोडक्यात बातम्या-

विराटच्या रोमँटीक पोस्टवर अनुष्काचं मजेशीर उत्तर, म्हणाली…

ओमिक्राॅनची धास्ती! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होणार?

एसटीनंतर आता टॅक्सी ड्रायव्हर्सचाही संपाचा इशारा, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

‘महाराष्ट्र वसूली संस्कार’; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More