बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्यांच्या मदतीनेच परमबीर सिंह परदेशात फरार झाले – नाना पटोले

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तसेच त्यांना लूकआऊटची नोटीस देखील बजावण्यात आली आहे. मात्र, तरी देखील परमबीर सिंह परदेशात फरार झाले आहेत. यामुळे लूकआऊटची नोटीस असताना देखील परमबीर सिंह देशातून फरार कसे झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा सध्या परमबीर सिंह यांचा शोध घेत आहे. त्यांचं शेवटचं लोकेशन अहमदाबाद असल्याचं तपासात समोर आलं आहे. अशातच परमबीर सिंह यांच्या शेवटच्या लोकेशनवरुन काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेत्यांच्या मदतीनेच परमबीर सिंह परदेशात फरार झाल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, परमबीर सिंह यांचं शेवटचं लोकेशन अहमदाबाद दाखवण्यात आलं आहे. केंद्र सरकारचं मूळ देखील गुजरातमध्येच आहे. याचाच अर्थ असा होतो की, राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याचा केंद्र सरकारने वापर केला आहे.

हे सर्व प्रकरण समोर येऊ नये म्हणून परमबीर सिंह यांना परदेशात पळवून लावण्यामध्ये केंद्र सरकारचा हात आहे. आता या प्रकरणामुळे सत्य बाहेर येणार आणि केंद्रातील भाजप सरकारचे दबावतंत्र समोर येणार, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रसिका सुनिलने चाहत्यांना दिली गुड न्यूज!

“पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका”

‘या’ गोळीने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी झाला ;अमेरिकन कंपनीचा दावा

भारतीय रेल्वेने भंगार विकून कमावले कोट्यवधी रुपये; आकडा वाचून थक्क व्हाल

“अन्याय सहन करूनही फक्त पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More