बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबला मदत केली’, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

मुंबई | तेरा वर्षापूर्वी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातून आलेल्या या दशदतवाद्यांनी संपुर्ण मुंबईला दहशतीखाली आणलं होतं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. अशातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मुंबई पोलीसमधील निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ज्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. त्यावेळी परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल गायब केला होता आणि कसाबला मदत केली, असा आरोप शमशेर खान पठाण यांनी केला आहे. शमशेर खान पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं. त्यांत त्यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.

तत्कालिन वरिष्ठ पीआय यांनी कसाबकडून एक फोन सापडल्याचं म्हटलं होतं. तो फोन पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. त्यानंतर गिरगाव चौपाटीच्या सिग्नलजवळ परमबीर सिंह आले आणि त्यांनी तो फोन स्वत:जवळ ठेवला, असं शमशेर खान पठाण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, याच फोनवरून कसाब हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानात असलेल्या त्यांच्या हँडलरशी बोलत होता. त्या फोनमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले असते, असंही शमशेर खान पठाण यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More