बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह बेपत्ता! उच्च न्यायालयात राज्य सरकारची धक्कादायक माहिती

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच परमबीर सिंह यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून परमबीर सिंह राज्यात नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

परमबीर सिंह कुठे आहेत?, याविषयी अद्यापही कुणाला माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करण्याचं दिलेलं आश्वासन राज्य सरकारला पाळता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात मांडली आहे. मात्र परमबीर सिंह यांना अजूनही फरार घोषित करण्यात आलेलं नाही, असं परमबीर सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयासमोर सांगितलं आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात समन्स बजावून देखील ते अद्याप न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई करावी लागणार आहे. त्यावेळी परमबीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेणार ते आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अलिकडेच परमबीर सिंह हे देश सोडून परदेशात गेल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यावर आम्ही परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. जर ते भारताबाहेर गेले असतील, तर ती चांगली बाब नाही, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

IRCTCच्या स्टॉकमध्ये एवढी मोठी घसरण का? एक्सपर्ट म्हणतात…

मोठी बातमी! प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक; कलम 144 लागू

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More