Top News

“सुशांतच्या मृत्यूबाबत एम्सने दिलेल्या अहवालाने सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत”

मुंबई | मुंबई पोलिसांना तपासादरम्यान ज्या बाबी आढळून आल्या होत्या त्याच एम्सच्या डॉक्टरांना आढळल्या आहेत. यावरुन आमचा तपास योग्य होता यावर शिक्कामोर्तब होतं, असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात ज्या बाबी आढळल्या होत्या त्याच इथेही आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा आणि कूपर रुग्णालयाचा तपास योग्य होता. या तपासावरुन आमच्यावर खूप आरोप झाले. मात्र, एम्सच्या अहवालानं हे सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत, असं परमबीर सिंग म्हणालेत.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांनी व्यवस्थित हाताळलं. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी प्रत्येक प्रकरणं व्यवस्थित हाताळली आहेत, असं परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे

राज्यातील केवळ 30-40 टक्के रेस्टॉरंट, बार सुरु होणार

IPL2020- विराट कोहलीच्या नावे अजून एक नवा विक्रम

“नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारे ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या