बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक व्यवस्था 15 दिवस बंद

परभणी | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या देशपातळीवर सर्वाधिक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारतर्फे लाॅकडाऊनच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचंही दिसुन येत आहे. याच पार्श्वभुमीवर परभणी जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक सेवा 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी संपुर्ण बंद करण्यात आली होती.

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 22 मार्चपासुन सर्व प्रकारची खाजगी व सार्वजनिक वाहतुक जिल्हाभरात बंद केली. तसेच काही दिवसांसाठी कडक संचारबंदीचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर आता परभणी जिल्ह्यात वाहतुक सेवा आणखी 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

संचारबंदीचे आदेश यापुर्वी 31 मार्चपर्यंत देण्यात आले होते, त्या आदेशाला आता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुदतवाढ दिली असून आता 5 एप्रिल पर्यंत संचारबंदी आदेश परभणी जिल्ह्यात लागु असणार आहे. तसेच वाहतुक व्यवस्थेला 15 मार्चपर्यंत संपुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुक सेवा बंद असल्याने दररोज 800 ते 900 फेऱ्यांमधुन जवळपास 30 लाखांचा नफा कमावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचं मोठं नुकसान होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच आता आणखी 15 दिवसांची वाढ केल्याने कोट्यवधींचा भुर्दंड आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला सहन करावा लागणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास होताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई

महाराष्ट्रात 2 एप्रिलपासुन मर्यादित लाॅकडाऊन?; वाचा कसं असु शकतं स्वरूप

“हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता पण…”- ममता बॅनर्जी

भारताच्या माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण; मोदींनी फोनवरून दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More