Parbhani Loksabha Election 2024 | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Loksabha Election 2024) महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हा मोदींनी महादेव जानकर यांना माझे लहान भाऊ असल्याचं भरसभेत वक्तव्य केलं होतं. मात्र आता मोदींचे भाऊ म्हणजेच महादेव जानकर हे तब्बल एक नाही दोन नाहीतर आता 18 हजार मतांनी मागे असल्याची माहिती समोर आली आहे. (Parbhani Loksabha Election 2024)
बंडू जाधव यांना भरघोस मतांचं लीड
परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha Election 2024) ट्विस्ट निर्माण झालाय. महादेव जानकर यांच्याविरोधात परभणीतून महाविकास आघाडीचे नेते बंडू जाधव हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. बंडू जाधव यांनी 18 हजार मतांनी लीड मिळवलं असल्याची माहिती समोर आली आहे. तर मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभावही या मतदारसंघात पाहायला मिळाला.
एक्झिट पोलच्या सांगण्यावरून बंडू जाधव यांना आघाडी मिळेल. तसेच बंडू जाधवच विजयी होतील अशी माहिती समोर आली आहे. बंडू जाधव यांच्या फेरीनुसार मतदानाचा टप्पा जाणून घेऊया. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बंडू जाधव यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा आहे. तसेच महादेव जानकर आणि बंडू जाधव यांच्यातील मतांविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. (Parbhani Loksabha Election 2024)
महादेव जानकर आणि बंडू जाधव मतमोजणी
बंडू जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघातून आघाडीवस असून
पहिली फेरी 20786
दुसरी फेरी 20904
तिसरी फेरी 20864
चौथी फेरी 20208
पाचवी फेरी 20096
तसेच महादेव जानकर हे पिछाडीवर असून
पहिली फेरी 17612
दुसरी फेरी 15149
तिसरी फेरी 16671
चौथी फेरी 14043
पाचवी फेरी 18539
News Title – Parbhani Loksabha Election Mahadev Vs Jankar Bandu Jadhav News Update
महत्त्वाच्या बातम्या
मावळमध्ये कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
वसंत मोरेंना पुणेकरांनी नाकारलं; फॉलोवर्स एवढेही मतं पडली नाहीत
ओमराजे निंबाळकरांचं डोंगराएवढं लीड… अर्चना पाटील यांचा पराभव अटळ?
जालन्यात रावसाहेब दानवेंचं टेंशन वाढलं! कॉँग्रेस उमेदवाराची जोरदार आघाडी
मोदींची लाट ओसरली?; महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने भाजपचं टेन्शन वाढवलं