देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची शाळांवर सक्ती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा-2’ कार्यक्रम 29 जानेवारीला शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवण्याचं नियोजित आहे. मात्र, हा कार्यक्रम दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे.

कार्यक्रम घेतल्याचा पुरावा म्हणून छायाचित्रांसह अहवाल देण्यास शाळांना सांगण्यात आलं आहे. तसं न केल्यास कारवाई करण्याचा सुचक इशारा शाळांना देण्यात आला आहे.

दूरचित्रवाणी, इंटरनेट, रेडिओ यापैकी कोणत्याही उपलब्ध माध्यमाच्या उपयोगाने हा कार्यक्रम शाळेत पार पाडण्याचे शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम दाखवणं योग्य. मात्र याची सक्ती करणं योग्य नसल्याचं जेष्ठ शिक्षणतज्ञ डाॅ वसंत काळपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

-युतीसाठी नरेंद्र मोदींची डिनर डिप्लोमसी! उद्धव ठाकरेंना दिलं भोजनाचं निमंत्रण

-बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘पद्मविभूषण’ जाहीर

-नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न! 

-गिरीश महाजनांच्या संवेदनशीलतेने वाचले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या