Parinay Fuke | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे यांनी काही काळासाठी मराठा आंदोलन स्थगित केलं आहे. पण, आता ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आता सर्वांचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागलं आहे. अशात भाजप नेत्याने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
या आरोपांनी महाराष्ट्रातील राजकारण अजूनच तापलं आहे. शरद पवार हे कायम ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत, असा आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. इतकंच नाही तर, मनोज जरांगे यांना पवारांनी पाठबळ दिल्याचंही फुके (Parinay Fuke) यांनी म्हटलंय.
परिणय फुके यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
“शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे, हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही. उलट त्यांच्याविरोधात भूमिका घेतली.”, असा आरोप परिणय फुके यांनी केला.
तसंच शरद पवार हेच मनोज जरांगे यांना पाठबळ पुरवत असल्याचा गंभीर आरोप देखील परिणय फुके यांनी केलाय. इतकंच नाही तर, जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी काही आरोप केले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले तर राज्यात तेढ निर्माण होईल, हेच जरांगे यांना पाहिजे, असं परिणय फुके (Parinay Fuke) म्हणाले आहेत.
सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार
दरम्यान, आज 22 जूनरोजी सरकारचे शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात पाच मंत्री, एक आमदार व एक माजी आमदार असणार आहे.
सरकारच्या शिष्टमंडळमध्ये मंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामत,मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि आमदार गोपिचंद पडळकर यांचा समावेश आहे.
News Title – Parinay Fuke on Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
शिवभक्तांनो उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी; जाणून घ्या अधिक
केसातील कोंड्यापासून सुटका हवीये? तर ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी केसांना लावा
“मनोज जरांगेंची उंची आहे का?, कोण कोणाला पाडतं दाखवून देऊ”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ह्युंदाई कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद होणार
सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!