बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो डिलिव्हरी बॉय दोषी आहे, असं मला वाटत नाही’; झोमॅटोच्या कामराजला परिणीतीचा मदतीचा हात!

बंगळुरू | काही दिवसांपूर्वी एका महिलेनं झोमॅटोवरून जेवण मागवलं होतं. मात्र, ऑर्डर यायला उशिरा झाल्यानं तिनं मागवलेलं जेवण कॅन्सल केलं. या गोष्टीचा राग आल्यानं डिलीव्हरी देणाऱ्या मुलाने त्या महिलेच्या नाकावर मारलं आणि यात तिला नाकाला जबर मार लागला असा दावा करणारा एक व्हिडीओ त्या महिलेनं शेअर केला होता.

बॉलिवुडची अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या वादात उडी घेतली असून या प्रकरणात झोमॅटोने लवकरात लवकर सत्य समोर आणण्याची  विनंती तिने केली आहे. कामराज हा डिलिव्हरी बॉय दोषी आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे, झोमॅटोने लवकरात लवकर चौकशी करून या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा तसेच माझी काही मदत लागली तर मी करायला तयार आहे. अशा आशयाचं ट्विट करून तिने आपला पाठिंबा कामराजच्या बाजूने दर्शवला आहे. परिणीतीच्या या ट्विटनंतर तिच्या चाहत्यांनी परिणीतीवर या प्रकरणात भूमिका घेतल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आरोप झालेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव कामराज असून, “मी त्या महिलेच्या घरी पोहोचून ऑर्डर दिली आणि संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता म्हणून मी पैसे घेण्याची वाट बघत होतो. ऑर्डर पोहोचवण्यास उशिर झाला होता म्हणून मी त्यांची माफी मागितली होती. ट्रॅफिक जास्त होतं आणि रस्ता खराब असल्यानं उशिर झाल्याचं सांगितलं”, असं स्पष्टीकरण कामराज यांनी दिलं होतं.

संबंधित महिलेनं झोमॅटो सपोर्टशी बोलुन ऑर्डर रद्द केली. मात्र त्यांनी पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता. बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेनं शिवीगाळ केली, चप्पलनं मारहाण केली आणि  स्वत:च्या अंगठीनं नाकावर मारुन घेत जखम केली. असंही कामराजने बोलताना स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे”

सोने इतक्या हजारांनी स्वस्त; जाणुन घ्या आजचा भाव!

महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी- चंद्रकांत पाटील

अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!

“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More