Loading...

‘सायना’च्या शुटींगदरम्यान परिणीती चोप्रा झाली जखमी!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित ‘सायना’ या बायोपीकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान परिणीतीच्या मानेला दुखापत झाली आहे.

परिणीती चोप्रा सायनाची भूमिका वठवण्यासाठी खास मेहनत घेत आहे. परिणीतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

Loading...

‘सायना’ चित्रपटाची पूर्ण टीम माझी पूर्णपणे काळजी घेत आहे. मला कुठं दुखापत होऊ नये, याकडं त्यांच खास लक्ष असतं. पण तरीही दुखापत झालीच. बॅटमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी शक्य तितका अधिक वेळ आराम करणार आहे, असं परिणीतीने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.

‘सायना’ या चित्रपटात परिणीती  भूमिका करत असली तरी बॅटमिंटनही चांगलं खेळता यावं असा तिचा अट्टहास आहे. परिणीती यासाठी चक्क सायनाच्या घरातही काही दिवस राहिली होती. याआधी ‘सायना’ चित्रपटासाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती. श्रद्धाचे वेळापत्रक व्यस्त असल्याने शेवटी परिणीतीने पुढाकार घेतला आहे.

 

Loading...

 

महत्त्वाच्या बातम्या –

 

Loading...

 

 

 

Loading...