Paris Olympics मध्ये भारताच्या खात्यात दुसरं पदक; नेमबाजीत ‘या’ जोडीने रचला इतिहास

Paris Olympics 2024 | भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. त्यामुळे भारताला दुसरे पदक मिळाले आहे. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीला हरवून ही (Paris Olympics 2024 ) कामगिरी केली आहे.

यापूर्वी मनू भाकरने रविवारी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. मनू भाकर ऑलिम्पिकमधील 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तसेच एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

नेमबाजीत मनू भाकर-सरबज्योत यांचं यश

पॅरिसमध्ये मिळालेल्या पहिल्या यशानंतर 48 तासानंतर मनु भाकरने आणखी एक ब्रॉन्ज जिंकून इतिहास रचला आहे. यामुळे देशभरातून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या मॅचच्या सुरुवातीला (Paris Olympics 2024 ) कोरियाने पहिला सेट जिंकला. त्यानंतर सलग 5 सेट मनु आणि सरबज्योतने जिंकले.

भारत स्पर्धेत कितव्या स्थानी?

आता भारत 2 कांस्य पदकांसह पदकतालिकेत 25 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, जपान 6 सुवर्ण आणि 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर फ्रान्स 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह दुसऱ्या (Paris Olympics 2024 ) स्थानावर आहे.

तर जपान आणि फ्रांसनंतर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत चीनच्या खेळाडूंनी 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. यानंतर दक्षिण कोरिया सहाव्या स्थानावर आहे. तसेच पदकतालिकेत अमेरिका सातव्या स्थानावर आहे.

News Title- Paris Olympics 2024 Manu Bhaker and Sarabjot Singh win bronze

महत्वाच्या बातम्या :

राज ठाकरेंना ‘सुपारीबाज’ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींवर मनसैनिकांकडून हल्ला; अकोल्यात प्रचंड गोंधळ

“…तर उद्या एखादा दहशतवादीही नाव बदलून भेटायला येईल”; सुप्रिया सुळे संतापल्या

“चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड..”; ‘या’ महिला नेत्याचा थेट इशारा

मराठा आंदोलकांचा ताफा थेट ‘मातोश्री’वर; अंबादास दानवे म्हणाले, ही भाजपची माणसं..

मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर