Vinesh Phogat l विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विनेशने उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह विनेशने भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले आहे. या विजयासह विनेशने भारताची 16 वर्षांची प्रदीर्घ मालिका देखील कायम ठेवली आहे.
विनेश फोगटने 16 वर्षांचा वारसा कायम ठेवला :
भारताने गेल्या 16 वर्षांपासून कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदके निश्चितच जिंकली आहेत. गेल्या 16 वर्षांचा वारसा कायम ठेवत विनेशने कुस्तीत भारतासाठी पदक निश्चित केल आहे. मात्र, अंतिम सामना जिंकून विनेश सुवर्णपदक मिळवेल अशी आशा कोट्यवधी भारतीयांना लागली आहे. विनेशची आज, बुधवार 7 ऑगस्ट रोजी सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडशी लढत होणार आहे.
2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत पदक जिंकले असले तरी एकवेळही सुवर्ण जिंकता आलेले नाही. मात्र, यावेळी विनेश फोगटकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. विनेशने सुवर्णपदक मिळवले तर ती ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीत सुवर्ण जिंकणारी पहिली कुस्तीपटू बनेल.
Vinesh Phogat l फायनल सामना कधी व कुठे पाहता येईल? :
जागतिक स्तरावर – स्पोर्ट्स 18-3, स्पोर्ट्स 18-1 एचडी, स्पोर्ट्स 18-2,
भारत फिड – स्पोर्ट्स 18-2 एचडी, स्पोर्ट्स 18-1
भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग – जिओ सिनेमाया ओटीटी प्लॅटफॉर्मवर संपूर्ण सामना पाहता येईल.
वेळ : रात्री 9 वाजून 45 मिनिटं
News Title : paris olympics 2024 vinesh phogat final match
महत्त्वाच्या बातम्या-
रितेश देशमुखबद्दल जिनिलियाने केला सर्वात मोठा खुलासा!
अनन्या पांडेने हिप सर्जरी केली?; ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
हवेलीत पार पडली ‘अजित मॅरेथॅान’, प्रतिक्षा बाजारे यांच्याकडून आयोजन
मनोज जरांगे पाटील 7 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; असा असणार दौरा
बजाजची ‘ही’ बाईक एकदा चार्ज केल्यावर धावणार तब्बल 136 किमी; जाणून घ्या किंमत