परळीत आणखी एका सरपंचचा मृत्यू, सर्वत्र एकच खळबळ

Parli Accident sarpanch dies on the spot

Parli Accident | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबररोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील इतरही अनेक गुन्हे या काळात समोर आले. अशात परळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Parli Accident )

परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले यात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालाय. या भीषण अपघातात त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झालाय. परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला.

परळीत सरपंचाचा भीषण अपघात, जागीच मृत्यू

सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर परळीत हा भीषण अपघात घडला. आता या अपघाताने पुन्हा खळबळ उडाली आहे.

अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर परळीतील राखेचे अर्थकारण पुन्हा चर्चेत आले आहे. कारण, यामुळे परिसरातील 8 ते 9 गावांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. याविरोधात काही सरपंचांनी विरोधही केला होता. अशात हा अपघात घडल्याने याबाबतही आता वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. (Parli Accident )

संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट-

दरम्यान, बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाली आहे. कालच, या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला.

एसआयटीने हा मोक्का लावला आहे. मात्र, मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे कराडवर मोक्का लावण्यात आला नाही. तर आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत.

News Title : Parli Accident sarpanch dies on the spot

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ फोनबाबत विष्णु चाटे तोंड उघडेना; CID कडून अजूनही तपास सुरूच

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे दर

हार्ट अटॅक नव्हे तर…टिकू तलसानिया यांना झालंय तरी काय?; प्रकृती अत्यंत नाजुक

दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?

आजचे राशीभविष्य! कुंभ, मकर व तुळसह ब्रह्म योगात ‘या’ राशींचं भाग्य उजळणार

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .