बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, ‘या’ वादळी मुद्द्यांवर होणार चर्चा

नवी दिल्ली | काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली.  कॅबिनेटनेही या निर्णयाचं स्वागत करत याला मान्यता दिली आहे. आजपासूून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात हे तीन कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक मांडण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. मोदींनी हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात अयशस्वी ठरल्याची खंत व्यक्त केली. मात्र हे कायदे चुकीचे असल्याचं ते म्हणाले नाहीत. त्यामुळं त्या कायद्यांमध्ये बदल करून हेच कायदे परत आणले जातील असा संशय शेतकऱ्यांना आहे. कृषी कायद्यांबरोबरच एमएसपी, महागाई यांसारख्या महत्वाच्या मुद्दयांवर संसदेत चर्चा होणार आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला नेहमी आवर्जून उपस्थित असणारे नरेंद्र मोदी कालच्या बैठकीला मात्र नव्हते. ते इतर कामात व्यस्त असल्याचं कारण देण्यात आलंय. यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याची शंका व्यक्त होत आहे. आम आदमी पक्षाचे संजय सिंग या बैठकीतून अर्ध्यातूनच निघून गेले.

कोरोनामुळं मृृत्यू झालेल्यांना चार लाख रूपयांची मदत सरकारने करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याबाबत आज आवाज उठवणार असल्याची काॅँग्रेसची भूमिका आहे. काल पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत 31 पक्षांनी हजेरी लावली होती. ज्या मुद्दयांना स्पीकर परवानगी देतील त्या मुद्दयांवर चर्चा करणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

विराटच्या रोमँटीक पोस्टवर अनुष्काचं मजेशीर उत्तर, म्हणाली…

ओमिक्राॅनची धास्ती! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More