बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही-धनंजय मुंडे

बीड | मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू सुधारत आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने अनलॉक करायला सुरूवात केलीये.

मात्र काही तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचंही शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेला काही सूचनाही केल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी तिसऱ्या लाटेत बीडमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे.

परळीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते त्या ठिकाणी बोलत होते. कोरोनाची येणारी तिसरी लाट ही गंभीर आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज आहे. त्यासोबतच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना किती आरोग्य सुविधा, ऑक्सिजन आणि औषध साठा लागेल याची निश्चिती करा. तसेच दररोज 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट पुर्ण करताना राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वेगाने वाढवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा”

कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर पाणी; सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More