बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर ‘या’ जिल्ह्यात बदली!

अमहदनगर | राज्य सरकारने राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे. विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थानिक विरोध करत आहेत. तर राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे.

पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्यावरील आरोपांमुळे ज्योती देवरे या प्रकाशझोतात आल्या होत्या. ज्योती देवरे प्रकरणाला आलेल्या राजकीय वळणामुळे त्यांची बदली जळगाव जिल्ह्यात करण्यात आली आहे. ज्योती देवरे यांनी निलेश लंके यांच्यावर एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप केलेे होते. ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य आढळलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

ज्योती देवरे यांनी अनेक विभागात भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. परिणामी त्यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात येत आहे, असं  राज्य सरकारचे सहसचिव माधव वीर यांनी देवरे यांच्या बदलीच्या आदेशात म्हटलं आहे. देवरे यांची जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

 

दरम्यान, ज्योती देवरे यांच्या बदली करण्यानं राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत. देवरे यांच्या बदलीने निलेश लंके यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

अमेरिकेचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानला करणार ‘इतक्या’ मिलीयन डाॅलर्सची मदत

शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More