लहानपणी मीसुद्धा ‘ते’ सिनेमे चोरून पाहायचो- पर्रिकर

पणजी | लहानपणी मीसुद्धा चोरुन अडल्ट सिनेमे पाहायचो, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं. बालदिनानिमित्त एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यकर्मादरम्यान तुम्ही तरुणपणी कोणते चित्रपट पाहायचात? असा प्रश्न एका विद्यार्थ्यानं विचारला. आम्ही फक्त चित्रपटच नाही पाहायचो, तर अडल्ट सिनेमेहीही बघायचो, तुम्ही आता ज्या गोष्टी उघडपणे टीव्हीवर पाहू शकता त्या तेव्हा अडल्ट सिनेमामध्ये दाखवल्या जायच्या, असं उत्तर त्यांनी दिलं.

18 वर्षांचा झालो तेव्हा अडल्ड सिनेमा बघायला गेलो. त्यावेळी माझ्या बाजुच्या सीटवर आमच्या शेजारचे बसले होते, तशीच घरी धूम ठोकली, अशी आठवणही त्यांनी सांगितली