पार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा… मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो!

पुणे |  आपल्या अडखळलेल्या भाषणाबद्दल राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. झाल्या प्रकारावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एक दोन चूका झाल्या. याचा अर्थ असा नाही की त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायला हवं.काही लोक भाषण करतात आणि काम करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असं पार्थ पवार म्हणाले.

पार्थ पवार यांनी अडखळत अडखळत वाचून जेमतेम अडीच ते तीन मिनिटे भाषण केलं. त्यावर त्यांच्यावर सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरू आहे.

विविध वृत्तवाहिन्यांना मी मुलाखती देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

सुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा

भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश?

-राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश!