नातू पार्थ पवार म्हणतात, आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे…

पिंपरी चिंचवड |  आपल्याला आजोबांना म्हणजेच शरद पवारांना पंतप्रधान करायचं आहे, असं वक्तव्य मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केलं आहे.

शरद पवार हेच पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत, असंही पार्थ पवार म्हणाले. मावळ लोकसभेच्या प्रचारानिमित्त ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

मोदी त्यांचं गुजरात मॉडेल घेऊन देशभर फिरतात मग आपण पिंपरी चिंचवडचं मॉडेल घेऊन  महाराष्ट्रभर फिरू शकत नाही का, असंही पार्थ यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपल्या पहिल्या वहिल्या अडखळलेल्या भाषणानंतर पार्थ यांच्या दुसऱ्या भाषणात त्यांच्यातला आत्मविश्वास दिसत होता.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींच्या सभेने बंगालमधील वातावरण झालंय टाईट….!

सुनील तटकरे खा.गीतेंना म्हणतात, जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा…

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट!

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…??- महादेव जानकर

बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर