बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पार्थ पवार फाऊंडेशनचा गरजू लोकांना मदतीचा हात; हजारो जणांना मोफत जेवण

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलाआहे. त्यामुळे गोरगरीब गरजूंचे दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. पार्थ पवार फाऊंडेशननं अशा गरजूंच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याचं काम केलं आहे

पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ, लोणावळा, पनवेल, खारघर, कामोठे, कल्याण, अहमदनगर या भागातील हजारो नागरिकांना या मोफत जेवणाचा फायदा होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून हे मोफत जेवण देण्यात येत आहे.

22 मार्चपासून आजपर्यंत हा उपक्रम सुरु असून सर्वकाही सुरळीत होत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असल्याचं पार्थ पवार फाऊंडेशनकडून सांगण्यात आलं आहे. गरजू नागरिकांनी देखील पार्थ पवार फाऊंडेशनचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

दगडूशेठ गणपती ट्रस्ट मदतीला धावलं; केली गरजू नागरिकांना मदत

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक, कोरोनाने पुण्यात आणखी दोघांचा बळी

विरोधकांच्या टीकेनंतर कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचं महत्वाचं पाऊल!

पहिलं प्राधान्य लोकांच्या जीवाला, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं- सुरेश रैना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More