पंढरपूर | राज्यात परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केलं. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय. पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान या आपत्तीजन्य परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पार्थ पवार यांनी आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत करण्याचं त्यांच्या सहकऱ्यांना सुचवलं. त्यानुसार याच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून आज भोसे, ओझेवाडी, सरकोली या भागात नुकसानग्रस्त कुटूंबांना मदत करण्यात आलीये.
या भागातील कुटुंबाना पार्थ पवार फाऊंडेशनकडून एक महिना पुरेल इतक्या दैनंदिन वस्तूंच्या किटचं आज वाटप करण्यात आलंय. अतिवृष्टीमुळे या भागात राहणाऱ्या लोकांची परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे पार्थ पवार यांनी तिथल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केलाय.
यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील,पंढरपूर साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके,भोसे गावचे उपसरपंच गणेश पाटील, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष करण कोकणे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, म्हणाले…
‘मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही’; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ भाजप नेत्याचा निर्धार
“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं”
कोण आहे ‘तो’ भाजपचा नेता, फक्त त्यानंच एकनाथ खडसेंना फोन केला!