बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पार्थ पवार पुन्हा मावळातून निवडणूक लढवणार का?; ट्विटमुळे चर्चांना उधाण

मुंबई | मागील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांचा मावळ मतदार संघात पराभव झाला होता. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पार्थ पवार यांचा पराभव होता. अशातच आता पार्थ पवार यांनी केलेल्या एका ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून पार्थ पवार पिंपरी चिंचवड शहरात शड्डू ठोकला आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांनी देखील पिंपरी चिंचवडकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. अशातच पार्थ पवार यांनी पुन्हा मावळातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार का?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावले आहेत. विकासात कर रूपाने सर्वांनीच समान वाटा दिलाय. त्यामुळे शहरी व बाहेरचा वाद उभा करून सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावं. गाववाला आणि बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही. आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत, असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे.

पार्थ पवार यांच्या या ट्विटमुळे आता पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं संकेत दिल्याचं सांगितलं जातंय. जर या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा पत्ता कट होऊ शकतो.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More