महाराष्ट्र सोलापूर

“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे.

माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार की भारत भालके यांच्या मुलाला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या