Baramati | शरद पवार यांच्या बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दरवर्षी दिवाळी पाडव्याला कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवारांना भेटण्यासाठी येत असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा साजरा केले आहेत. एक अजित पवार यांचा काटेवाडीत आणि दुसरा शरद पवार यांचा पाडवा गोविंदबागेत.
राजकीय पातळीवर सुरु असलेला संघर्ष आता कौटुंबिक पातळीवर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमध्ये राष्ट्रवादी विभागली गेली. आता तर कित्येक वर्ष एकत्र होणारा दिवाळी पाडवा देखील वेगळा झाल्याचं दिसलं.
Parth Pawar सोशल मीडियावर ट्रोल
पहिल्यांदाच दोन वेगवेगळे पाडवा साजरा होत असताना अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी प्रतिक्रिया देताना पार्थ पवारांनी एक वक्तव्य केलंय. ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पार्थ पवार (Parth Pawar) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
पार्थ पवार नेमकं काय म्हणाले?
यावेळी बोलताना पार्थ पवारांनी शरद पवार आणि आमची विचारधारा एकच असल्याचं म्हटलंय. पण आम्ही दुसऱ्या लोकांबरोबर पार्टनरशिप केलीये. त्यांना ते नको होतं, असं पार्थ पवार म्हणालेत. आम्हाला वाटलं भाजप, शिवसेनेसोबत जायला हवं पण त्यांना वाटतं नाही करायला पाहिजे. हे आमचे विचार आहेत, असंही ते म्हणालेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
दोन दिवाळी पाडवा आता इथून कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण वेगळा पाडवा करायला पाहिजे. त्यानुसार अजितदादांनी हा निर्णय घेतला. आपण आता हे कायम करणार आहोत, असं पार्थ पवारांनी यावेळी सांगितलंय.
आत्ता कळले, दादा मुलांना प्रचारात का घेऊन जात नाहीत, का बोलु देत नाहीत 😂
बाकी जयदादा दिसलेच नाहीत आज.
लवकर उठले नसतील may be 🤔 pic.twitter.com/QNCCbbczpH— अपरिचित- शोध सत्याचा 🚩 (@pratik_patil124) November 2, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
भाऊबीजेला लाडक्या बहीणींसाठी गिफ्ट शोधताय?, मग ‘इथे’ मिळेल ट्रेंडी ऑप्शन
श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल!
देवेंद्र फडणविसांच्या जीवाला धोका?, सुरक्षेत करण्यात आली मोठी वाढ
शरद पवारांचा महायुतीवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले..
विधानसभेत महाविकास आघाडी मारणार बाजी?, सर्व्हेतून मोठी माहिती समोर