Top News महाराष्ट्र मुंबई

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल!

मुंबई |  शरद पवार यांनी इममॅच्युअर म्हटल्याने राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी पवारांच्या वक्तव्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचं देखील टाळलं. अशातच आता पार्थ पवार सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. (Parth pawar Meet Sharad Pawar At Silver Oak)

आज दिवसभर माध्यमांमध्ये पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार यांनी केलेल्या टीकेनंतर पार्थ पवार देखील खूप नाराज होते. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये तशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती.( Parth pawar Meet Sharad Pawar At Silver Oak)

काल रात्री देखील सिल्वर ओकवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. तसंच आज देखील जयंत पाटील सोडता पवार कुटुंबामध्ये एकूणच दोन दिवसातल्या परिस्थितीवर गुफ्तगू होणार आहे. (Parth pawar Meet Sharad Pawar At Silver Oak)

दुसरीकडे आज दुपारी मंत्रालयात जाऊन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यात 15 मिनिटे गुप्त चर्चा देखील पार पडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात गेलेले नेते, आमदार पक्षात परतण्यास उत्सुक असून त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेऊन भाजपला मोठा हादरा देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याची चर्चा आहे. (Parth pawar Meet Sharad Pawar At Silver Oak)

सुशांत आत्महत्या प्रकरणात मनसेचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

जगातील प्रसिद्ध अभिनेत्यांना बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने टाकले मागे…

सुशांत सिंग राजपूतच्या डायरीतले ‘हे’ सत्य अखेर आले समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या