बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी द्या; शेकापची मागणी

मुंबई | मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्यासमोर ठेवली आहे.

पार्थ पवार मावळमधून लोकसभा लढल्यास एकतर्फी लढत होईल. पार्थ पवार समर्थ उमेदवार असल्याने शेकाप त्यांना बिनशर्त पाठिंबा देईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-युपीएच्या 10 वर्षांच्या काळात 12 वेळेस हवाई हल्ले केले- काँग्रेस

खासदार संजय काकडे अखेर ‘काँग्रेस’मध्ये प्रवेश करणार

-मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? धनंजय महाडिकांचा पलटवार

-“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त माणसाची बेताल बडबड”

“हवाई हल्ल्याचा तपशील देऊन आम्ही जवानांचा जीव धोक्यात घालायचा का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More