पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या
इंदापूर | हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु समजले जातात. पण राजकारणाबाहेर शत्रुत्व संपतं, असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे. याचंच एक उदाहरण इंदापूरमध्ये पहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी इंदापूरात जाऊन हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपुर्वी निधन झालं होतं. याच प्रार्श्वभुमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेेट घेतली आहे. मयुरसिंह पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आहेत. त्यांच्या आई अनुराधा अरूणराव पाटील याचं अल्पशः आजारानं 18 मार्च रोजी निधन झालं होतं. पार्थ पवारांनी मयुरसिंह पाटील आणि त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली आणि त्याचं सांत्वन केलं.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील देखील यावेळी उपस्थित होत्या. पुण्यातील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी अंकिता पाटील यांनी ती जागा जिंकत राजकारणात प्रवेश केला होता. तर पार्थ पवार यांनी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती परंतू त्यांना त्या जागेवर शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा नव्या जोमानं पार्थ पवार राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता. तरीही त्यांना विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा देण्यात आली नाही, असा आरोप पाटलांनी केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस
नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदयानं काढली जंगी मिरवणूक; पाहा व्हिडीओ
विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण!
‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.