बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही अंश:त लाॅकडाऊन; जाणून घ्या!

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संर्सग वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हााधिकाऱ्यांनी दिली आहे.

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत. बार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील गर्दीच्या स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई होणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह जर इतरत्र फिरताना दिसला, तर गंभीर कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभांवर पूर्णतः बंदी लावण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी असतील. शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळं बंद राहणार आहेत. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, कोरोना जनजागृती सप्ताहही राबवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ”

‘हे महाराष्ट्राच बजेट की मुंबई महापालिकेचं’; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

अखेर अमृता फडणवीसांच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More