“साडेतीन खासदारांचा नेता, तरीही त्यांना पंतप्रधान व्हावं वाटतंय”
मुंबई | राज्यात सध्या एनसीबी, आयकर विभाग, ईडी यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. एनसीबी आणि एनसीपी वादात आता भाजपनं उडी घेतली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एनसीबी आणि गांजा प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मी पाहिलंय देशात दक्षिणेकडील राज्यात विविध पक्षांकडं 20, 25, 30 खासदार आहेत पण ते कधी स्वत:ला भावी पंतप्रधान म्हणवून घेत नाहीत. मात्र आपल्या राज्यात साडेतीन जिल्ह्याचा आणि साडेतीन खासदारांचा नेता तरीही यांना पंतप्रधान व्हावं वाटतं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
शरद पवार यांना जसं पंतप्रधानपदाचं स्वप्न पडतं तसं मलाही पडावं वाटतं पण स्वप्न पडत नाही, अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा खोत यांनी केली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांना जे जमलं नाही ते शरद पवार आणि नवाब मलिक यांनी करून दाखवलं आहे. हर्बल वनस्पती सापडल्यावरून खोत यांनी ही टीका केली आहे.
दरम्यान, हर्बलयुक्त गांजाच्या शोध यांनी लावला आहे. या नविन वाणाचं बियाणं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पवार आणि मलिक यांनी द्यावं. या वाणाच्या लागवडीनं महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा मलिक यांच्या जावयासारखं श्रीमंत होतील, असा टोला खोत यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या
“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”
दबाव आला तरी सहन करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राहुलचा धमाका, रोहितची तुफान खेळी; ऑस्ट्रेलियावर भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय
अन् नगरसेवकांच्या वादावरून नाना पटोले आणि अशोक चव्हाणांनी लावला डोक्याला हात
MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फाॅर्म
Comments are closed.