Loading...

“गोपीनाथ मुंडेंनाही पक्षातून काढण्याचा ठराव भाजपने मांडला होता”

मुंबई | गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपने मांडला होता. मात्र आम्ही त्याला वेळीच विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला, असा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे  यांनी केला आहे.

भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपवण्याचा डाव आखला. जो प्रकार गोपीनाथ मुंडेंसोबत भाजपने केला तसचं पंकजा मुंडे सोबत  केला जात आहे. पंकजा मुंडे यांना परळीतून भाजपनेच पाडलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी वेळीच निर्णय घ्यावा, असा सल्ला प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे.

Loading...

मी भाजप सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. मी भाजपची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलंय आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, प्रकाश शेंडगे यांनी 2014 मध्ये भाजपशी रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत ओबीसी संघटनेची बांधणी सुरू केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...