पराभवानंतर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पुणे | भाजपने (BJP) टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारल्याने या निवडणुकीत मानापमान नाट्य पाहायला मिळालं. अखेर कसब्यात रविंद्र धंगेकर हे विजयी झालेत.
पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली होती. यावर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कुठेतरी कमी पडलो, जो निकाल असेल तो मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये.
कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही, असं रासने म्हणालेत.
नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.