बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अफगाणिस्तानमधून आलेल्या ‘इतक्या’ लोकांची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर तेथील नागरिकही आता देश सोडून जात आहे. भारतासह इतर देश त्यांच्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  अफगाणिस्तानमधून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या प्रवाशांमधून काही प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी कतारच्या राजधानीतुन चार वेगवेगळ्या विमानाने 146 जण भारतात दाखल झालेत. अमेरिका आणि उत्तर अंटलाटिक करार संघटनेतील नाटोच्या विमानातून या लाेकांना गेल्या दिवसात काबूलमधून दोहोला आणण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी दोहोमधून एका विशेष विमानाने त्या नागरिकांना दिल्लीत आणण्यात आलं. त्या प्रवाशांमधून दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समजत आहे.

गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर भारतीय हवाई दलाचा एक विमान उतरलं. या विमानात एका अफगाणिस्तानातील 168 जण भारतात आले. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हेही होते. तसेच या लोकांमध्ये अफगाणिस्तामधील भारतीय राजदुतावास आणि त्यातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकुन असलेल्या सगळ्या भारतीयांची काळजी भारत सरकारला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला भारतात सुरक्षित पोहचवण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे, असा दिलासाही भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये अडकुन असलेल्या नागरिकांना दिला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More