बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जवान देवदूतासारखे धावून आले अन् लोकलखाली जाता जाता वाचला प्रवासी, पाहा व्हिडीओ

मुंबई | लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. मुंबईची अर्थव्यवस्था लोकलच्या वाहतुकीवर आधारलेली आहे. मुंबईमध्ये दरवर्षी खूप अपघात होत असतात. लोकलमधून पडून तसेच प्लॅटफाॅमवर अपघात घडत असतात. असाच एक प्रकार मुंबईतील डॉक यार्ड रेल्वे स्थानकावर घडला आहे.

एक व्यक्ती स्थानकावर पोहोचली. ती व्यक्ती रेल्वे स्थानकावर पोहचली रेल्वे सुटण्याची वेळ झाली. रेल्वे धिम्या गतीने धावू लागली. कामाला उशिर होऊ नये म्हणून त्या व्यक्तीनं रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. तो व्यक्ती वेळी नेमकी दरवाजातून आत जाण्याच प्रयत्न करत होता. मात्र, त्यावेळी रेल्वे सुरू झाल्यानं त्यांचा तोल गेला आणि तो गाडीतून खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तो व्यक्ती लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं जीआरपीएफ सुरक्षा रक्षकांनी पाहिलं. लोकल सुरू झाल्यानं त्यांचा तोल गेला आणि तो व्यक्ती खाली पडला, हे पाहिल्यावर त्या ठिकाणी उपस्थित असलेलेल्या तीन जीआरपीएफच्या सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि मागे ओढलं. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. ही व्यक्ती वृद्ध असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मयुर शेळके या कर्मचाऱ्याने एक्सप्रेस ट्रेनखाली येणाऱ्या एका लहान मुलाला वाचवतानाचा मुंबईतील व्हिडिओ समोर आला होता. जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहचून त्यानं लहान मुलाला वाचवलं होतं.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

भाजप मनसेला टाळी देणार का?; मनसे-भाजप युुतीबाबत फडणवीस म्हणाले…

अनलॉकचे पाच टप्पे निश्चित; सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

फेसबुकचा डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; केली ही मोठी कारवाई

…तोपर्यंत कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More