बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परदेशी खेळाडूला पहावले नाहीत भारतीयांचे हाल, ॲाक्सिजनच्या पूर्ततेसाठी 37 लाखांची मदत

मुंबई | कोरोनाने देशभरात हैदोस घातलेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे काळाप्रमाणे आव वासून बसलेला कोरोना आहेच मात्र आता ऑक्सिजनचा तुटवडा पडू लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशातच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातील परदेशी खेळाडू पॅट कमिन्सने आक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आयपीएल ही जगातील सर्वात प्रसिद्ध लीग आहे. यामध्ये अनेक परदेशी खेळाडू भाग घेतात. त्यासोबतच आपले भारतीय क्रिकेटपटूही यामध्ये खेळत असतात. खेळाडूंना या लीगमध्ये करोडोमध्ये बोली लावली जाते. त्यातील पॅट कमिन्सला 2020च्या मोसमातील आयपीएलच्या इतिहासातील दुसरी मोठी बोली लागली. 2020 मध्ये तो कमिन्सला 15.50 कोटी रूपयांची बोली लागल्याने तो मालामाल झाला होता.

कमिन्सने याची जाण ठेवत भारतीयांचे होणारे हाल आणि भारतातील गंंभीर परिस्थिती पाहून भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आयपीएलसह भारतात इतके खेळाडू आहेत परंतू एकाही खेळाडूला आपल्या देशातील परिस्थितीचं गांभीर्य नाही की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. पॅट कमिन्स तर परदेशी खेळाडू आहे मात्र एकाही भारतीय खेळाडूला मदत का करावीशी वाटली नाही?, त्यामुळे पॅट कमिन्सचं कौतुक करेल तितकं कमीच आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनामुळे कलाकारांवरही वाईट वेळ, तारक मेहता फेम नट्टू काकांची परिस्थिती गंभीर

“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”

‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार 

नोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More