काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

पतंगराव कदम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आजारी होते. शनिवारी त्यांची तब्येत आणखीनच बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

आघाडीच्या सरकारमध्ये पतंगराव कदम वनमंत्री होते. तसेच त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली आहे.