Top News खेळ

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

दिल्ली | भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे परिणाम आयपीएलवरही पडलेले पहायला मिळाले. बीसीसीआयला IPL च्या तेराव्या सिजनसाठी व्हिवो कंपनीसोबतचा करार स्थगित करावा लागला. त्यानतंर तेराव्या सिजनसाठी बीसीसीआय सध्या नवीन स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जियो, बायजूस, अॅमेझॉन, कोका कोला हे ब्रँड स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर आता योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे.

13 व्या सिजनसाठी पतंजली लवकरच आपली निविदा दाखल करणार असल्याचं समजतंय. पतंजली उद्योगसुमहाचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांच्या सांगण्यानुसार, “पतंजली हा बँड जागतिक पातळीवर पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरुयेत. त्यानुसार आयपीएलच्या तेराव्या सिजनला स्पॉन्सरशिप देता येईल का यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत.”

व्हिवोसोबतचा करार रद्द केल्यानंतर बीसीसीआय़ अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं की, “बीसीसीआयवर कोणतंही आर्थिक संकट आलंय असं मी अजिबात म्हणणार नाही. परिस्थिती पाहून व्हिवोसोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय प्रत्येकवेळी दुसरा पर्याय तयार ठेवतं आलं आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी जरी काही अडचण आली तरीही त्याचा फारसा परिणाम होत नाही.”

प्रत्येक हंगामाला व्हिवो कंपनी बीसीसीआयला 440 कोटी रुपये देत होती. आयपीएलच्या तेराव्या सिजनची घोषणा करताना गव्हर्निंग काऊंसिलने व्हिवोची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण लक्षात घेता बीसीसीआयने वर्षभरासाठी व्हिवोसोबतचा करार स्थगित केलाय.

महत्वाच्या बातम्या-

पार्थ पवारांच्या राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; “संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सहनूरने 30 हजार सॅनिटरी पॅडचं केलं वाटप

टिकटॉक खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट नाहीतर ‘ही’ मोठी कंपनी तयार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या