बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं”

नवी दिल्ली | हिंदू धर्मात भारतात गाईला पवित्र मानलं जातं. त्यामुळे काही ठिकाणी गायीची पुजा केली जाते. उत्तर प्रदेशसह काही राज्यात गोमांसला देखील बंदी घालण्यात आली आहे. अशातच आता योगगुरू रामदेव बाबाने गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. हा प्रस्ताव टीटीडी ट्रस्टनेही पाठवला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेदेखील मागणी करतो की, त्यांनी लवकरात लवकर गाईला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असं रामदेव बाबा म्हणाले.

पतंजलीने गायींसाठी गोरक्षण मोहीम सुरू केली आहे. गायींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही आघाडीवर आहोत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांना टीटीडी गो महासंमेलनाबद्दल माहिती दिली होती. हिंदू धर्माचा प्रचार केल्याबद्दल टीटीडीचे अध्यक्ष वाय.व्ही सुब्बा रेड्डी यांचेही रामदेव बाबा यांनी कौतुक केलं आहे.

दरम्यान, गायीची हत्या करणं तर मोठा गुन्हा आहेच. मात्र गायीला कुठल्याही प्रकारची इजा करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा व्हायला हवी, असं अलिकडेच एका न्यायालयात न्यायमूर्ती यादव यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता रामदेव बाबा यांनी ही मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

“2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर…”

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

भारताच्या पराभवाचा पाकड्यांना आनंद! लाईव्ह कार्यक्रमात वसिम-वकार नाचले; पाहा व्हिडीओ

‘त्या’ अँथममधून जयदीप राणाचं नाव वगळलं; नवाब मलिकांचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More